संततधार पावसामुळे बुलढाणा-खामगाव रस्ता बंद !

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बुलढाणा ते खामगाव रोड बंद झाला असून सर्वत्र नदीनाले दुधडी भरून वाहत आहेत.

बुलढाणा जिल्हात मागील २४ तासापासून संततधार सुरु आहे. मुसळधार नसला तरी या अखंडीत पावसामुळे अनेक नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. हा भिज पाऊस सर्वत्र सुरु आहे. पावसाला खंड नसल्यामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, बुलढाणा ते खामगांव मार्ग बंद आहे. रोहना परिक्षेत्रातील नदी नाले पुलावरून वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. बुलढाणाकडून खामगांवकडे जाणारी अनेक वाहने आता पुलाच्या अलीकडेच थांबलेली आहे.

दरम्यान, या संदर्भात प्रशासनाने नागरिकांना आवाहन करत खामगांव किंवा अकोलाकडे जाणार्‍यांनी बोथा मार्गाने जाणे टाळावे असे आवाहन केले आहे. याशिवाय खामगाव तालुक्यातील आवार येथील नालाही तुडुंब झाला आहे. तसेच सुटाळा येथील नदी नाला सुद्धा दुथडी भरून वाहत आहे.

सोमवारचा शासकीय कार्यालय निमित्त घाटाखालचे अनेक नागरिक हे बुलढाणा कडे जात असतात त्यातच मागील २४ तासाच्या संततदार पावसामुळे बोथा मार्गे जाणार्‍या रस्ता बुलढाण्यातील रोहना गावाला जलमय झाल्याने संपूर्ण गावाचा व घाटा खालच्या व घाटावरील जिल्हा मुख्यालय बुलढाणाचे संपर्क तुटला आहे. तरी देखील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी असं प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content