लेबर कॉन्स्ट्रॅक्टरची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील यश नगर भागातून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रमेश मांगीलाल ढामळे वय ४४ रा. चाळीसगाव हे लेबर कॉन्स्ट्रॅक्टर म्हणून काम पाहतात. याच कामाच्या निमित्ताने ते चाळीसगाव शहरातील यश नगरात दुचाकी क्रमांक (एमएच ४१ बीबी २४७६) ने कामाच्या निमित्ताने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी यश नगरातच पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्याने पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना २३ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता समोर आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राहूल सोनवणे हे करीत आहे.

Protected Content