कारच्या काचा फोडून महागडा लॅपटॉप लांबविला

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील बन्सीलाल मॅरेज लॉन्स येथे पार्कींगला लावलेल्या कारचे काच फोडून २५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, काजल रविंद्र पवार वय २७ रा. पनवेल जि. रायगड या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २८ एप्रिल रोजी महिला ही नातेवाईकडे आलेल्या होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील बन्सीलाल मॅरेज लॉन्स येथे त्यांनी त्यांची कार पार्कींगला लावलेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारचे काच फोडून कारमधून २५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप चोरून नेला. हा बाब लक्षात आल्यानंतर काजल पवार यांनी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.

Protected Content