जे.टी. महाजन इंजीनियरिंगमध्ये “क्लाऊड डेटा वेअरहाऊस” या विषयावर मार्गदर्शन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जे.टी. महाजन इंजिनीयरिंग कॉलेजची ४० वर्षे जुनी समृद्ध परंपरा आहे. अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहेत. असेच एक माजी विद्यार्थी श्री कल्पेश बढे, सिनियर डेव्हलपर, मेड लाईफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांनी “क्लाऊड डेटा वेरहाऊस” या विषयावर कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

त्या सत्रात त्यांनी सांगितले की पूर्वीच्या काळात फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, फाईल्स इत्यादी गोष्टी स्टोअर करण्यासाठी सिडी आणि डिव्हीडी चा वापर केला जायचा. पण जस जसे तंत्रज्ञान वाढत गेले तस तसे फ्लॅश ड्राईव्ह व पेन ड्राईव्ह ह्याचा स्टोरेजसाठी चा उपयोग होऊ लागला. त्यानंतर हळू हळू जास्त जागेसाठी एक्स्टरनल हार्ड ड्राइव्हचा वापर होऊ लागला. पण ह्या सर्व मध्ये पोर्टेबिलिटी नव्हती. तसेच जास्त फाईल्स आणि फोटोज् स्टोअर केल्यामुळे जागा कमी पडू लागली. त्यासोबत यातीलल डेटा एकदा डिलिट झाला की,ख्‍ परत मिळत नव्हता. त्यामुळे एका नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावण्यात आला आणि ते तंत्रज्ञान म्हणजे “क्लाऊड स्टोरेज टेक्नॉलॉजी” ही एक अशी सर्व्हिस आहे. ज्यामध्ये आपला डेटा ऑनलाईन मॅनेज, मेन्टेन आणि बॅकअप केला जातो. अशी सविस्तर माहिती प्रॅक्टिकल स्वरूपात दिली.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, मार्तंड भिरुड, सचिव विजय झोपे व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ आर.डी.पाटील, प्राचार्य डॉ.के.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, डीन डॉ.पी.एम महाजन, तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ ए.एम.पाटील, डॉ.डी.ए.वारके, प्रा. डी.आर.पाचपांडे, प्रा. वाय.आर.भोळे, प्रा मोहिनी चौधरी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी प्रा अभय नेहेते,प्रा पंकज देशमुख,प्रा.डी. आर. नेमाडे, प्रा स्वप्नाली वाघुळदे, प्रा कोमल पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content