कचरा टाकण्याच्या संशयावरून बापलेकावर कोयत्याने वार; तर महिलेला शिवीगाळ

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरातील कचरा प्लॉटमध्ये टाकण्याच्या संशयावरून तरूणासह वडीलांवर कोयत्याने वार करून गंभीर केले तर तरूणच्या पत्नीला देखील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना अमळनेर शहरातील शहा आलम नगरात रविवारी २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील शहा आलम नगरात एजाज सैय्यद अलिम वय २८ आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. एजाज सैय्यद अलिम व त्याचे कुटुंबिय हे घरातील कचरा प्लॉटमध्ये टाकत असल्याच्या संशयावरून रविवारी २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एजाज सैय्यद अलिम याची पत्नी नाजामानिबी यांच्या पत्नीला शेजारी राहणाऱ्या दोन महिला शिवीगाळ करत मारहाण होत्या. त्यावेळी पत्नीला सोडविण्यासाठी गेलेल्या एजाज सैय्यद अलिम याला देखील अन्वर खान महेताब, तन्वीरखान अन्वर, इम्रान खान अन्वर, अलिशानबी अन्वर आणि शहनाजबी इम्रामन खान सर्व रा. शहा आलम नगर अमळनेर यांनी मारहाण केली. मुलाला मारहाण करत असल्याचे पाहून एजाज चे वडील आलीम सैय्यद हमीद हे भांडण सोडविण्यासाठी आले. याचा राग आल्याने संशयित तन्वीर खान अन्वर याने बापलेकावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत दोघे जखमी झाले. पुन्हा जर प्लॉटमध्ये कचरा टाकला तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी एजाज सैय्यद अलिम याने सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारे अन्वर खान महेताब, तन्वीरखान अन्वर, इम्रान खान अन्वर, अलिशानबी अन्वर आणि शहनाजबी इम्रामन खान सर्व रा. शहा आलम नगर अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठायात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष पवार हे करीत आहे.

Protected Content