शेतातून ३० हजार रुपये किंमतीच्या इलेक्ट्रिक केबलची चोरी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील शेत शिवारातुन अज्ञात चोरट्यांनी २४ शेतकऱ्यांच्या सुमारे ५०० मीटर लांबीच्या ३० हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक केबल चोरुन नेल्याची घटना घडली आली असून शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेवुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत पाचोरा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, माहेजी ता. पाचोरा येथील हरिष भिमराव पाटील यांची गिरणा नदी काठावर विहीर असुन या विहिरीतुन इलेक्ट्रिक मोटर द्वारे शेती पिकास पाणी पोहचविण्यासाठी इलेक्ट्रिक केबल लावली होती. हरिष पाटील हे दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना विहीरीत इलेक्ट्रिक केबल दिसुन आली नाही. त्यावेळी हरिष पाटील यांच्या निदर्शनास आले की, इलेक्ट्रिक केबल अज्ञात इसमांनी कापुन चोरुन घेऊन गेला आहे. त्यांनी आजुबाजुच्या विहिरीकडे जावुन बघीतले असता विहीर मालक समाधान पाटील, दिनेश भगत, पंडीत पाटील, उमेश पारसी, पंढरी पाटील, संदिप गायकवाड, कृष्णा गायकवाड, नागो पाटील, शिवाजी पाटील, ईश्वर पाटील, राजु पाटील, अमृत पवार, भिका बापुजी, देवकर सालवे, साहेबराव पाटील, संभाजी पाटील, नितीन पाटील, हरिष सोनार, विरभान बडगुजर, उमेश भगत, हर्षल पटेल, अकरम देशमुख, कडुबा पाटील सर्व रा. माहेजी ता. पाचोरा यांची सुमारे ४०० मिटर लांब इलेक्ट्रिक केबल व हरिष पाटील यांची १०० मिटल लांब इलेक्ट्रिक केबल अशी ३० हजार रुपये किंमतीची केबल अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरुन नेल्याने २० जुलै रोजी हरिष पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शामकांत पाटील व पोलिस काॅन्स्टेबल सचिन पवार हे करीत आहे.

Protected Content