लाचखोर ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गटार ढापे बांधण्याचे कामाचे बिल पास करण्यासाठी ११ हजाराची लाच घेतांना ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी १५ व्या वित्त आयोगांतर्गत निधीतून गटार व ढापे बांधण्याचे काम पुर्ण केले. दरम्यान कामाचे बिल अदा होण्यासाठी चोपडा तालुक्यातील वर्डी येथील ग्रामविकास अधिकारी भगवान पांडूरंग यहीदे रा. बोरवले नगर, चोपडा यांनी १२ हजाराची लाच मागितली तडजोडी अंती ११ हजाराची रक्कमेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून ११ हजाराची लाच घेतांना ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजित चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा,मोरे , सुधीर मोरे यांनी केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयित आरोपी ग्रामविकास अधिकाऱ्यावर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content