Home Cities अमळनेर महाराणा प्रताप जयंती निमित्त अमळनेरात अभिवादन

महाराणा प्रताप जयंती निमित्त अमळनेरात अभिवादन

0
43

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती निमित्त महाराणा प्रताप चौकातील स्मारकस्थळी सामूहिक पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर तालुका राजपुत समाज पंच मंडळातर्फे करण्यात आले होते.  शहर व ग्रामीण भागातील राजपूत समाज बांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराणा प्रतापसिंह यांचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी आगामी जून महिन्यात तिथीनुसार येणारी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती प्रचंड उत्साहात साजरी करण्यात येईल असे पंच कमिटीच्या वतीने घोषित करून तयारीसाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी राजपूत समाज पंच मंडळाचे अध्यक्ष रणजित भिमसिंग पाटील,शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील,तसेच नरेंद्रसिंग ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष चंदूसिंग परदेशी, भरतसिंग पाटील, अमळनेर बाजार समितीचे संचालक जितेंद्र राजपूत, अँड दीपेन परमार, पत्रकार चेतन राजपूत, अजयसिंग पाटील, राजुसिंग परदेशी, अनिलसिंग पाटील, प्रदीप राजपूत, दिनेशसिंग राजपूत, गोटू राजपुत, रणजितसिंग राजपूत, सूरज परदेशी, विलाससिंग पाटील, अमोल राजपूत, स्वर्णदीप राजपूत, कुणाल गिरासे, हर्षल परदेशी, राजेंद्रसिंग पाटील, महेश राजपूत, सामाजिक संस्थांचे ट्रेनर किशोर अहिरराव, रामलाल पाटील, नितीन राजपूत, जयराम पाटील, दीपक पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, रघुनाथ पाटील, अरुण पाटील(लोणे), गोविंदा पाटील, रमेश पाटील, अरुण पाटील(रामेश्वर), सतिश पाटील, दिनेश पाटील यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound