भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील करंजी शिवारातील शेतात शेत रस्ता वापराच्या कारणावरून एका महिलेला तीन जणांनी शिवीगाळ करून डोक्यावर काठीने व दगडाने मारहाण करून दुखापत केली. तसेच पती व जेठ यांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, सविता किरण पाटील (वय-३२) या विवाहिता भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे वास्तव्याला आहे. त्यांचे भुसावळ तालुक्यातील करंजी शिवारातील शेत गट नंबर १८४ मध्ये शेत आहे. शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्या पती व जेठ यांच्यासोबत शेतात जात असताना शेतातील शेत रस्ता वापराच्या कारणावरून विष्णू निवृत्ती तळेले, रामा विष्णू तळेले आणि रेखा विष्णू तळेले सर्व रा. पिंपळगाव बुद्रुक ता. भुसावळ यांनी महिला सविता पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच यांच्यासह पति व जेठ यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली, मोबाईल फोडून नुकसान केले. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर महिलेने दुपारी २ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी विष्णू निवृत्ती तळेले, रामा विष्णू तळेले आणि रेखाबाई विष्णू तळेले या तिघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद कंखरे करीत आहे.