शिक्षेविरुद्ध खंडपीठात दाद मागणार – सरकारी वकील ॲड. चव्हाण

dhule news

जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळ्यातील सर्व 48 आरोपी झालेली शिक्षा आणि दंड हा असमाधानकारक असून या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी सांगितले.

बहुचर्चीक घरकुल घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षा आणि ठोठावलेल्या दंडावर आपण पुर्णतः समाधानी नसून आरोपींनी संगनमताने कट रचला असून जनतेच्या पैशाचा अपव्यय केला आहे. मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी म्हणून खंडपीठात आपण दाद मागणार असल्याचेही विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी सांगितले आहे

Protected Content