सोनी नगरातील गटार १५ दिवसात बांधून देण्याचे उपमहापौरांचे आश्वासन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका रहिवासीने गटार बंद केल्याने गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून येत असल्याची तक्रार केली होती. या अनुषंगाने तक्रारीची दखल घेत महानगरपालिकेच्या प्रशासनाने जेसीबीच्या माध्यमातून गटारी मोकळी केली. तसेच येत्या १५ दिवसात पक्के गटारी बांधून देण्याचे आश्वासन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शनिवारी ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता स्थानिक रहिवाशांना दिली आहे.

पिंप्राळा परिसरातील सोनी नगरातील नागरिकांच्या घरासमोर घाण पाण्याचे डबके साचल्याने परिसरातील महिलांनी मनपाचे उपायक्त गणेश चाटे यांच्याकडे समस्यांचा पाढा सांगितला होता. तसेच उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेऊन आपबिती सांगितल्यानंतर मनपाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत सोनगिरे व बांधकाम विभागाचे मनोज वनोरे यांनी प्रत्यक्ष परीसरात पाहणी करून शनिवारी ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता मनपाचे जेसिबीने ज्या व्यक्तीने गटार अडवून ठेवली होती, तेथूनच सुरुवात करुन अडविलेल्या गटारीचा मार्ग मोकळा झाला.

यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी १५ दिवसात नवीनच गटार बांधून देणार असे आश्वासन दिले आहे. यावेळी बांधकाम विभागाचे मनोज वनोरे, लिलाधर पाटील, दिपक पवार आदी महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content