बोदवड शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च

बोदवड प्रतिनिधी । बोदवड येथील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली तसेच संपूर्ण बोदवड शहरात प्रभातफेरी मार्गे रूट मार्च काढण्यात आला.

 

बोदवड येथील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी मुक्ताईनगर विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम आणि प्रभातफेरीमार्गे रूट मार्च काढण्यात आला. यावेळी मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी विवेक लावंड, बोदवड पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक राहूल खताळ, मुक्ताईनगर पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, बोदवड पोलीस स्टेशनच्या गोपनीय विभागाचे तुषार इंगळे, यांचेसह बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव येथील पोलीस कर्मचारी आणि बोदवड पोलीस स्टेशनचे ७ होमगार्ड या रूट मार्चमध्ये सहभागी होते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,जातीय सलोखा कायम राहील याची काळजी घ्यावी, तालुक्यातील शांतता भंग होवू नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड, बोदवड पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांचेसह उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केले.

Protected Content