छत्रपतींना मान खाली घालायला लावू नका- पंकजा मुंडे

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून माविआने पाठिंबा द्यावा असे आवाहन करूनही शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरला आहे. आम्ही एका छत्रपतींना राजसभेवर पाठवले आता तुम्ही दुसऱ्या छत्रपतींना मान खाली घालायला न लावता राज्यसभेवर पाठवा असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीला केले आहे.

राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाला मिळालेला मराठा संघटनांचा पाठिंबा, विदर्भ आणि मराठवाडा या भागात त्यांची तयार झालेली जनप्रतिमा हे लक्षात घेता राज्यसभेसाठी संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मराठा व्होट बँकेच्या जोरावर महाविकास आघाडी अथवा शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळेल, भाजप किंवा महाविकास आघाडी पाठींबा देईल, असा विश्वास त्यांना होता. परंतु त्यांचा विश्वास आठ दिवसातच मावळला असून पाठींबा देण्याऐवजी त्यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. आमदारांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. शिवबंधनाची अट आणि भाजपकडून झालेले दुर्लक्ष यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची अधिकृत घोषणा करावी लागणार आहे.

राज्यसभा नाही तर राज्यच घेणार : मविआसह भाजपसाठी गंभीर इशारा  घडामोडी लक्षात घेता आता राज्यसभा नाही, तर स्वराज्य संघटना बळकट करून राज्यच घेणार अशी घोषणा केली आहे, यातून हा गंभीर इशारा महाविकास आघाडी तसेच भाजपसाठी दिला गेला आहे. उदयनराजे भोसलेंच्या बाबतीमध्ये आघाडी सरकारने जी भूमिका घेतली, त्याचे आम्ही स्वागत केले होते. आम्ही एका छत्रपतींना राज्यसभेवर पाठवले होते, आता तुम्ही दुसऱ्या छत्रपतींना राज्यसभेवर पाठवा. छत्रपतींना मान खाली घालायला लावू नका, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीला केले आहे.

Protected Content