राम मंदिरामुळे पर्यटनाला चालना मिळणार

अयोध्याधाम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राम मंदिराच्या उद्घाटनानंतर उत्तर प्रदेशच्या पर्यटन क्षेत्रात वाढ होणार आहे. भारतीयांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या अयोध्यामध्ये आधीच आर्थिक भरभराट होत आहे. अनेक कंपन्या येथे व्यवसाय सुरू करणार आहेत, त्यामुळे गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे.

यूपीमध्ये पर्यटन क्षेत्राला चालना दिल्याने उत्तर प्रदेश सरकारचीही भरभराट होणार आहे. एसबीआयच्या एका अहवालात याचा तपशीलवार खुलासा करण्यात आला आहे.
बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, 2022 मध्ये देशी पर्यटकांनी उत्तर प्रदेशमध्ये 2.2 लाख कोटी रुपये खर्च केले होते, तर विदेशी पर्यटकांनी केलेल्या खर्चाचा आकडा 10,000 कोटी रुपये होता.

अयोध्या हे पूर्वीपासूनच श्रद्धेचे मोठे केंद्र आहे आणि येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. उत्तर प्रदेशातील इतर पर्यटन स्थळांव्यतिरिक्त, 2022 मध्ये विक्रमी 2.21 कोटी पर्यटक एकट्या अयोध्येत पोहोचले होते. आता राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याने पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, असा अंदाज आहे.

 

Protected Content