आकर्षक आणि देखणे असे रामलल्लाचे रूप

अयोध्याधाम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख यजमान म्हणून पूजा केली. मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ८४ सेकंदांचा अत्यंत शुभ मुहूर्त होता. शुभ वेळ 12.29 मिनिटे 8 सेकंद ते 12.30 मिनिटे 32 सेकंद इतकी होती. अभिषेक झाल्यानंतर रामललाच्या डोळ्याची पट्टी काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येतील प्रभू राम लल्ला यांचे पहिले रूप समोर आले आहे.

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (सोमवारी) अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर, 51 इंच मूर्तीचा पहिली झलक जगासमोर आली. कर्नाटकातील अरुण योगीराज यांनी राम लल्लाची प्रतिमा साकारली आहे.

रामलल्लाची मूर्ती दागिन्यांनी सजलेली आहे. डोक्यापासून पायापर्यंत अनेक दागिन्यांनी मुर्ती सजवण्यात आली आहे. त्याच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे. कपाळाला सोन्याचा तिलक लावलेला आहे.

Protected Content