पळासखेडे बु॥ येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रशिक्षणाचे उद्घाटन

palakhada news

जामनेर (प्रतिनिधी)। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि राज्य शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथील खंडेराव महाराज मंदिराच्या आवारात नुकतेच मोफत विकास प्रशिक्षण महाअभियान संपन्न झाले. जामनेर तालुका मेडिसीन असोसिएशनचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील यांच्याहस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी एल.ओ.पाटील, माजी सरपंच संजय पाटील, कृष्णा साबळे, हेमंत पाटील, जिल्हा समन्वयक अमोल सुर्यवंशी, ग्रामपंचायत कर्मचारी नारायण गवळी, अरूण पाटील, विजय पाटील, सर्कल प्रशिक्षण ज्ञानेश्वर बुधवंत, राहुल बिलारे, सर्कल समन्वयक गजानन पाटील, रामा लोहार यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणात पिक व्यवस्थापन किड रोग नियंत्रण अन्नप्रक्रिया, काढणी पश्चात पिक व्यवस्थापन, गट शेती काळाची गरज, गट शेतीचे व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपनी बाबतची माहिती, शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन व कार्यपध्दती, शासकीय योजनांची ओळख, शेतमालाचे विपणन व मार्केटिंग आदि विषयी सखोल मार्गदर्शन करून माहिस्तव पुस्तक वाटप करण्यात आले.

Protected Content