उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई (वृत्तसंस्था) शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

 

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की.. असे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावर घेतली. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरेंना दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, द्रमुकचे अध्यक्ष एम. के स्टॅलिन, कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी,सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, राजू शेट्टी, छगन भुजबळ, अजित पवार, आरपीआयचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

Protected Content