राष्ट्रवादी काँग्रेसचे गरूड यांनी पत्रकारांची घेतली सदिच्छा भेट

शेंदूर्णी, ता. जामनेर, प्रतिनिधी| राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गरूड यांनी दीपावली निमित्ताने तालुक्यातील पत्रकाराची सदिच्छा भेट घेऊन मिठाईचे वाटप आज करण्यात आले.

जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांनी दिवाळीच्या निमित्ताने तालुक्यातील शेंदुर्णी येथील पत्रकारांची आज सदिच्छा भेट घेतली. पत्रकारांना मिठाईचे वाटप करून त्यांच्या गौरव केला. व दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वर्तमानपत्र व वेब मीडियाचे प्रतिनिधी आदींचा समावेश आहे. यावेळी माजी सरपंच सागरमल जैन, शांताराम गुजर यांचे हस्ते पत्रकार अतुल जहागीरदार, विलास अहिरे, डॉ.दीपक जाधव, डॉ.निलमकुमार अग्रवाल, ऍड देवेंद्र पारळकर, श्रीकृष्ण चौधरी, सुनील गुजर, योगेश सोनार, युवराज सूर्यवंशी, दिग्विजय सूर्यवंशी, शेख हमीद, प्रविण कापुरे,या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यानंतर लोहारा येथे पत्रकार बांधवांची सदिच्छा भेट कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दिलीप चौधरी, दिनेश चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत,अमोल माळी,रमेश शेळके,महेंद्र शेळके,दीपक पवार,आबा चौधरी, नाना चौधरी,व वेब मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर नेरी येथे पत्रकार प्रदीप चोपडे, रामविलास शर्मा, प्रशांत वाघ यांची सदिच्छा भेट घेऊन सागर कुमावत, दिनेश पाटील यांचे हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले. जामनेर येथील कार्यक्रमात शहरातील सर्व वर्तमानपत्र प्रतिनिधी,वेब मीडिया प्रतिनिधी यांची सदिच्छा भेट घेऊन मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी मा. संजय दादा गरूड,जामनेर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, शहर अध्यक्ष पप्पू पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील,माधव चव्हाण ,तालुका उपप्रमुख प्रल्हाद बोरसे, व्हिजिएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, प्रभू झालटे, विनोद माळी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. फत्तेपुर येथिल पत्रकारांची सदिच्छा भेट व मिठाई वाटप कार्यक्रम फत्तेपुर येथे संपन्न झाला यावेळी राहुल पाटील,विलास राजपूत, अरविंद चितोडीया, व तालुका प्रमुख राजू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी पत्रकार सलीम पटेल,सोनार सर,अभयराज राजपूत,सुनील शेजोळे,रमेश तेली,शकुर शेख सह अनेक पत्रकारांची सदिच्छा भेट घेऊन मिठाई वाटप केली. तसेच पहुर येथील पत्रकारांना सदिच्छा भेट कार्यक्रम कृषि पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेत आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार शरद लाठे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नियोजन मंडळ सदस्य संजयदादा गरूड, जामनेर तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष प्रदिप भाऊ लोढा, शामभाऊ साळवे, शैलेश पाटील, किरण पाटील, दिनेश माळी उपस्थित होते. दरम्यान मनोज जोशी, शरद बेलपत्रे, सादिक शेख,किरण जाधव, गणेश पांढरे,रविंद्र लाठे, रविंद्र घोलप, डॉ.संभाजी क्षिरसागर, संतोष पांढरे, जयंत जोशी इत्यादी पत्रकारांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

Protected Content