जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलचा तिढा सुटेना !

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा जागा वाटपावरून सुरू असलेला तिढा कायम असून आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतही कोणताच तोडगा न निघाल्याने आता उद्या माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी पहिल्यांदा सर्वपक्षीय पॅनलची चर्चा झाली. यासाठी अनेक बैठका होऊन देखील कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे भाजपने स्वबळाचा नारा दिला. तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसचे पॅनल बनणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र कॉंग्रेस पक्ष चार जागांवर अडून बसल्याने दोनदा बैठक होऊन देखील निर्णय घाला नाही.

या पार्श्‍वभूमिवर, आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृहात बैठक पार पडली. याप्रसंगी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आ. शिरीष चौधरी आदींसह इतर कॉंग्रेस नेत्यांची उपस्थिती होती. यात दीर्घ काळ चर्चा होऊन देखील महाविकास आघाडी पॅनलची चर्चा पूर्णत्वाला आली नाही. यामुळे आता उद्या दुपारी माघारी नंतरच चित्र स्पष्ट होणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. अर्थात, माघारीपर्यंत महाविकास आघाडी पॅनलचे अस्तित्व अधांतरी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content