दोन लाखांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विठोबा नगरातील माहेरवाशीनीला सासरी रामेश्वर कॉलनीत घर घेण्यासाठी २ लाखांची मागणी करत मारहाण करून छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रविवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील विठोबा नगरातील माहेर असलेल्या विवाहिता रूपाली भिकमचंद हळदे वय २८ यांचा विवाह जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील भिकमचंद नंदू हळदे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती भिकमचंद हळदे याने घर घेण्यासाठी माहेराहून २ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही. याचा राग आल्याने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू सासरे यांनी देखील पैशांची मागणी केली.

हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर रविवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती भिकमंचद नंदू हळदे, सासू रजूबाई नंदू हळदे आणि सासरे नंदू बंडू हळदे सर्व रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधा शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र बोदवडे हे करीत आहे.

Protected Content