पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आय.एस.ओ दर्जा

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील आठ वर्षापासून रुग्णसेवेत असलेले पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय. एस. ओ (I.S.O) 9001:2015 (Certify Quality system) मानांकन मिळाले आहे.

डॉ  प्रविण पाचपांडे यांचे मुक्ताईनगरमधील पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने रुग्णसेवा जपत सामाजिक बांधिलकी पण जोपासली आहे. रोग निदान शिबिरे तसेच रक्तदान शिबिर व उद्योगासंबंधी विविध शिबिर घेण्यात आले आहेत.  covid-19 महामारीमध्ये अनेक रुग्णांना जीवनदान दिले. अशा विविध प्रकारच्या समाजोपयोगी कार्यात सहभाग घेऊन नावलौकिक मिळालेले आहे.

विविध क्षेत्रातील  गुणवत्ता  तपासून त्यांना मानांकन संघटना आयएसओ या संघटनेमार्फत  मानांकन मिळाले  आहे.

येथे  जळगाव , भुसावळ , जामनेर , औरंगाबाद ,  मलकापूर येथील तज्ञ डॉक्टरांची सेवासुद्धा उपलब्ध आहे आय. एस .ओ मानांकन मिळवणारे जळगाव जिल्ह्यामधील पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुक्ताईनगर एकमेव खासगी रुग्णालय आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑपरेशन तसेच कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत.

आय .एस .ओ प्रमाणपत्र देताना प्रमुख अतिथी डॉ. जगदीश पाटील, डॉ. विक्रांत जयस्वाल, एड. प्रकाश पाटील (जामनेर) , दिगंबर किनगे ( मलकापूर ) आणि सुभाष सपकाळे   उपस्थित होते.

भविष्यात आता आणखी आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय दर्जाच्या प्रमाणपत्रासाठी आम्ही प्रयत्न करू  असे  हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण पाचपांडे यांनी यावेळी सांगितले

Protected Content