वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर पकडले

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा परिसरातून अवैध वाळूची वाहतूक करणारे डंपर एमआयडीसी पोलीसांनी पहाटे वाजता पकडले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील तांबापूरा भागात एमआयडीसी पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना शिरसोलीकडून जळगावात येणाऱ्या रस्त्यावर शुक्रवार २९ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे डंपर (एमएच १९ बीव्ही ७११७) एमआयडीसी पोलीसांनी शहा अवलीया मस्जीद जवळ पकडले. वाळू वाहतूक करण्याबाबत परवाना विचारला असता डंपर चालक कमलेश रमेश देवरे (वय-२८) रा. श्रीराम नगर, दादावाडी, जळगाव याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी डंपर ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अशपाक महेमुद शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालक कमलेश देवरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

Protected Content