Home Cities धरणगाव महात्मा फुले हायस्कूल येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर

महात्मा फुले हायस्कूल येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर

0
47


धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले आहे.

याप्रसंगी शाळेतील वर्ग ७ वी, वर्ग ८ वी, वर्ग ९ वी व १० वी च्या मुला – मुलींचे लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मयुर जैन, आरोग्य सहाय्यक रियाज देशमुख, डाटा एन्ट्री ऑपरेटर यश ब्राह्मणे, औषध निर्माता दिनेश बडगुजर, AN M रेखा सोनवणे, समुपदेशक गणेश कुंभार सर्व टीम चा समावेश होता. वरील सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी स्वागत केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथील समुपदेशक गणेश कुंभार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक एम.बी.मोरे, पी.आर. सोनवणे, एम.के. कापडणे, एस.व्ही.आढावे, पी.डी.पाटील, एस.एन. कोळी, एच.डी.माळी, सी.एम.भोळे, व्ही.टी.माळी, व्ही.पी.वऱ्हाडे, एम.जे.महाजन उपस्थित होते. लसीकरण शिबिर यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound