गायिका कनिका कपूर विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोनाची लागण झाल्यानंतरही १४ दिवस वेगळे राहण्याऐवजी ती लखनऊमध्ये पार्ट्या करत राहिली. यादरम्यान ती जवळपास ४०० हायप्रोफाइल लोकांच्या संपर्कात आली. अशा पद्धतीने बेजबाबदारपणे वागल्यामुळेच तिच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय.

 

एकच गोंधळ उडाला आहे. ११ मार्चला लंडनहून लखनऊमध्ये परतताना ती तब्बल ६८ जणांच्या संपर्कात आली होती. विशेष म्हणजे, तिने लखनऊमध्ये आल्यानंतर एका पार्टीत सहभागी झाली होती. त्या पार्टीमध्ये तिच्यासोबत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि खासदार दुष्यंत सिंहदेखील सहभागी झाले होते. आता कनिका कपूरवर लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कनिका लंडनहून परतल्यानंतर ४ पार्टी आणि एका फॅमिली फंक्शनमध्ये सहभागी झाली होती. त्यापैकी एक पार्टी १३ मार्चला लखनऊच्या ताज हॉटेलमध्ये झाली होती. या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह व यूपीचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह यात सहभागी होते. दरम्यान, पार्टीत कनिकासोबत सेल्फी घेणारे दुष्यंत संसदेत व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या एका कार्यक्रमातही सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोनाची साखळी राष्ट्रपती भावनपर्यंत पोहचली.

Protected Content