कोरोनाचा उगम झालेल्या वुहानमध्ये पुन्हा रुग्णवाढ

 

बीजिंग : वृत्तसंस्था । कोरोनाचा उगम झालेल्या चीनच्या वुहानमध्ये पुन्हा फैलाव सुरु झाला आहे.

 

वुहानमध्ये गेल्या काही दिवासात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचं संकट पाहता प्रशासनाने चाचण्यावर भर दिला आहे. वुहानमधील १.२ कोटी लोकसंख्येपैकी १.१ कोटी नागरिकांची चाचणी झाली असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. चार दिवसात वुहानमध्ये ९० टक्के लोकांची  चाचणी झाली आहे. वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर कोरोनाचा संपूर्ण जगात फैलाव झाला.

 

हुबेई प्रातांत ४७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ३१ प्रकरणं संसर्गजन्य आहे. वुहानमध्ये ६ जणांना लागण झाली आहे. तर ६४ जणांमध्ये कोणतीच लक्षणं नाही. या सर्वांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. चीनमध्ये शुक्रवारी १३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण आकडा ९३ हजार ६०५ इतका झाला आहे. ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ४४४ जणांवर उपचार सुरु असून ३९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

 

चीनमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने चीन निर्मित लसीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. डेल्टा व्हेरिएंटवर ही लस अकार्यक्षम असल्याचं बोललं जात आहे. त्यात काही  जण लस घेऊनही संक्रमित झाले आहेत, दक्षिण-पूर्व आशियाई देशांनी चीनची लस घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

 

Protected Content