दिल्ली दंगल प्रकरणी उमर खालिदला अटक

नवी दिल्ली । दिल्ली दंगल प्रकरणात पोलिसांच्या स्पेशल सेलने कारवाई करत वादग्रस्त विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणात अटक केली आहे. उमर खालिदला युएपीएअंतर्गत अटक करण्यात आली आहे. अनेक तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील सुत्रधार म्हणून अटक केली आहे. स्पेशल सेलद्वारे दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा तपास करत आहे. स्पेशल सेलने याआधाही उमर खालिदची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान स्पेशल सेलने उमर खालिद याला दंगलीबद्दल अनेक प्रश्‍न विचारले होते.

तर दुसरीकडे उमर खालिदच्या अटकेनंतर युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुपने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये दिल्ली पोलीस दंगलीच्या तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलने वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, सीएए आणि एनआरसीविरूद्ध लढा सुरूच राहणार आहे. त्याला जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करणे हे आमचे प्राधान्य आहे आणि दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची पूरेपूर काळजी घ्यावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content