मान्सूनपूर्व तयारी करता महापालिकेतील सर्व विभाग प्रमुखांना सूचना

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. त्यानुसार मान्सूनपूर्व तयारी करता महापालिकेत आयुक्तांच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची बैठक संपन्न झाली. यावेळी सर्व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या.

आज गुरुवार दि. 2 जून रोजी सकाळी 11 वा. आयुक्त यांच्या सभागृहात अतिरिक्त आयुक्त तथा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे नोडल ऑफिसर श्याम गोसावी यांचे सूचनेनुसार मान्सूनपूर्व तयारी करता सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा 2022 विषयी मार्गदर्शनपर सूचना –

त्यात सर्व विभागनिहाय कामकाजाबाबत आदेश, मार्गदर्शक सूचना, तसेच कार्यवाहीविषयी लेखी अहवाल मागण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन मनपा प्राधिकरणास कोणत्याही आपत्कालीन प्रसंगात सौम्यीकरण उपायोजना, तात्काळ प्रतिसाद, मदत व पूनर्वसन, समन्वय इत्यादी कार्यांविषयी आपत्ती व्यवस्थापन आराखडा सन 2022 करिता तयार करणे विषयी मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्यात.

आपत्कालीन कक्षाकडे विभागनिहाय दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक सूची –

शहरातील अंदाजित 175 मोबाईल टॉवर् वरील लाइटिंग, अँरेस्टरविषयी संबंधितांना नोटीस देऊन सुव्यवस्थित ठेवणे. त्याबाबत कळविणे; जेणेकरून वीज पडण्याच्या दुर्घटना 90 टक्के यामुळे कमी होतील. जीवित हानी टळू शकेल. तसेच विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेकरिता संबंधित अधिकारी/अभियंता यांचा विभागनिहाय दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक सूची आपत्कालीन कक्षाकडे 24 तासात उपलब्ध करून देणे. कार्यकारी अभियंता महावितरण यांचेकडे पत्राद्वारे आपत्कालीन कक्ष स्थापन करणे. त्याविषयी सूचित करणे. वीज प्रवाहाच्या लोंबकळणाऱ्या तारा, तारांना अडचणीच्या ठरणाऱ्या फांद्या काढणे. याविषयी विद्युत अभियंता विद्युत विभाग यांना सूचना करण्यात आल्या.

SMS  द्वारे सूचनासंदेश –

प्रभाग समिती क्र 1 ते 4 अंतर्गत येणाऱ्या पढाव इमारतींचा सर्वे करून प्रभागनिहाय पढाव घरांची अद्यावत माहिती संपूर्ण नाव पत्त्यासह सादर करणेबाबत प्रभाग अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या तसेच प्रभाग समिती क्रमांक 1 यांचे अधिपत्याखालील स्थापत्य कन्सल्टन्सी या मक्तेदारकडे शहरातील मिळकत धारकांचे उपलब्ध मोबाईल डाटा वर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबत सूचना संदेश SMS  द्वारे पाठवण्याची व्यवस्था करणेबाबत सुचित करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना –

आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येऊन 24 तास कार्यरत राहील याकरिता तात्काळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणेबाबत आस्थापना विभागास सुचित करण्यात आले.

आरोग्य व मलेरिया विभागास सूचना –

शहरातील नाले गटारी सफाई नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मोकळे करणे. साथीच्या रोगाची रोगराई पसरू नये म्हणून फिटिंग करणे. फॉगिंग मशीनद्वारे धुरळणी करणे. मलेरिया, डेंगू इत्यादी आजार पसरू नये म्हणून घरोघरी जाऊन नागरिकांना सूचना देणे. नागरिकांच्या जनजागृतीकरिता तसे सूचना पत्र पाठविणेबाबत आरोग्य विभाग, मलेरिया विभाग यांना सूचना देण्यात आल्या.

बांधकाम विभागास सूचना –

नाल्याकाठी राहणाऱ्या तमाम नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती विषयी तात्काळ सूचना करणे. विशेष करून बजरंग बोगदा तसेच शहरातील नाले/ उपनाले येथे पाण्याचा योग्य निचरा होईल. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य विभाग यांनी विशेष दक्षता घेणे. कॅटरपिलरची साफ सफाई करणे. जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल. याकरिता विशेष लक्ष देणेकरिता आरोग्य व बांधकाम विभाग यांना सूचना देण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांच्या आजूबाजूस लक्षात येईल. असे इशारा फलक बॅनर्स लावणे नाल्याचे बांधकामठिकाणी असलेले मटेरियल व्यवस्थेबाबत सूचना देणे. जेसीबी ऑपरेटर 24 तास करिता नेमणूक करणे व अभियंत्यांच्या भ्रमणध्वनी युनिट निहाय अद्यावत ठेवणे.

अतिक्रमण विभागास सूचना –

शहरातील नाले काठी असलेले अतिक्रमण काढणे. आपत्कालीन परिस्थितीत वाहनं सहकर्मचारी पुरवणे. याबाबत अतिक्रमण विभागात सूचना देण्यात आल्या.

प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना –

प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार गट रुग्णवाहिका वाहने सुसज्ज ठेवणे कालीन कक्ष स्थापन करणे. डॉक्टर, स्टाफ, रुग्णवाहिका वाहन चालक आदींची ड्युटी भ्रमणध्वनी सह 24 तासांकरिता करणे. याबाबत सूचित करण्यात आले.

पाणी पुरवठा विभागास सूचना – अशुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ नये तसेच पाईप लाईन गळती बाबत तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अँलम व क्‍लोरिन गॅस चा योग्य साठा उपलब्ध करण्यात यावा याबाबत पाणी पुरवठा विभाग यांना विशेष सूचना देण्यात आल्यात.

फायर ऑफिसर, अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागास सूचना –

फायर ऑफिसर यांना अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाकडील सर्व वाहने सुसज्ज ठेवण्यात यावी. आपत्कालीन परिस्थिती शोध व बचाव पथक तात्काळ प्रतिसादासाठी तैनात ठेवणे. शोध व बचाव पथकात काम कामात येणारे साहित्य सामुग्री व उपकरणे सुस्थितीत ठेवणेबाबत सूचना देण्यात आल्या.

Protected Content