यावल पोलीस वसाहतीत ट्युबवेलचे जलपुजन व लोकापर्ण

 

यावल, प्रतिनिधी । येथील पोलीस वसाहतीमधील अखेर पंचवीस वर्षानंतर पोलीस कर्मचारी बाधंवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या प्रयत्नांनी अखेर मार्गी लागल्याने पोलीस कर्मचारी बांधवांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे .

यावल येथील पोलीस बांधवांच्या हक्काचे निवासस्थान हे मागील २५ वर्षापुर्वी बांधण्यात आले होते. मात्र, काही वर्षानंतर शासनाच्या लाखो रुपयांची निधी खर्च करून बांधलेल्या या वसाहतीमधील निवास बांधण्याचे काम निकृष्ट प्रतीचे बांधण्यात आल्याने समोर आले. काही कालावधी नंतर ही निकृष्ट इमारत कोसळू लागल्याने पोलिस बांधव कुटुंबाच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोणातुन सर्व निवास निकामी करून इतरत्र राहात होती. यावल येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी सुत्रे स्विकारल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी यावल पोलीस स्टेशनला नागरीक सेवेचे कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचारी बांधवांच्या हक्काच्या निवासाच्या जिर्ण झालेल्या ईमारतीच्या कामाला प्राधान्य देवुन तात्काळ शासनाच्या माध्यमातुन पाठपुरावा करून ईमारतीच्या दुरुस्तीला वेगाने पुर्ण करून पुनश्च त्या विविध समस्यांनीग्रस्त जीर्ण ईमारतीस सुसज्ज करून त्यात पुन्हा पोलीस बांधवांनी वास्तव्यास सुरूवात केली आहे. मात्र पोलीस वसाहतीमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गेली पंचवीस वर्षापासुन प्रलंबीत होता. पोलीस निरिक्षक धनवडे यांनी आपल्या सर्व कर्मचारी बांधवांना विश्वासात घेवुन युद्धपातळी पोलीस वसाहतीच्या परिसरात पाण्यासाठी ट्युबवेल ( कुपनलिका ) चे कार्य हे अल्पावधीत पुर्ण करून आज दिनांक २५ आक्टोबर या विजया दशमीच्या दिवशी सकाळी ट्युबवेलच्या पाण्याचे पोलीस कर्मचारी भुषण चव्हाण यांच्या हस्ते सहपत्नीक विधीवत जलपुजा करून या ट्युबवेलला लोकापर्ण करण्यात आले. यावेळी पोलीस निरिक्षक अरूण धनवडे पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्यासह यावल येथे पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सर्व पोलीस कर्मचारी बांधव सहकुटुंब प्रामुख्याने या कार्यक्रमास उपस्थितीत होते .

Protected Content