कोरोना मृत्यूच्या संख्येत घट

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे तीन हजार ७४१ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मृत पावलेल्या रुग्णांच्या प्रमाणात ही आकडेवारी कमी असल्याचे दिसून येत आहे.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील दररोज साडेचार लाखांच्या आसपास असलेली रुग्ण संख्या आता घसरत असल्याचं दिसून येत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ३० लाखांच्या खाली आली आहे. पण देशातील मृतांची दररोजची सरासरी  खाली येताना दिसत असून, देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत दोन लाख ४० हजार ८४२ नवीन  बाधित रुग्ण आढळून आले आहेत.  तीन लाख ५५ हजार १०२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.  काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन संख्येत कोणतीही घट होताना चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन हजार ७४१ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ९९ हजार २२६ वर पोहोचली आहे.

 

गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी गेला आहे. राज्यात शनिवारी  ६८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २६ हजार १३३ नवीन  बाधित आढळून आले आहेत.

 

देशात सध्या २८ लाख ५ हजार ३९९ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ४० हजार २९४ रूग्ण   बरे झाले असून, २६ हजार १३३ नवीन  बाधित आढळून आले आहेत.

 

Protected Content