धावत्या ट्रकचे चाक निखळून धडकले; दुचाकीस्वार गंभीर जखमी

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव नजीक महामार्गावर धावत्या ट्रकचे चाक अचानक निखळून समोरून येणाऱ्या दुचाकीला हा धडकल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. 

सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव जवळ भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या सिमेंटच्या ट्रक (एमएच १५ एफव्ही ९९९४) चे मागचे टायर अचानक निखळल्याने बादल गोकुळ पवार रा. साकेगाव ता.भुसावळ जि.जळगाव हा तरूण दुचाकीने साकेगावकडून भुसावळकडे जात असतनांना दुचाकीवर ट्रकचे चाक धडकले. या अपघातात तरूण गंभीर जखमी झाल्याची  घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरूणास तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

Protected Content