फैजपूरात कोळी समाजाचा वधू वर परीचय मेळावा उत्साहात सपन्न

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील कोळी समाजाचा वधू वर परीचय मेळावा मेळावा फैजपूर येथील सुमंगल लाँनमध्ये उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाला.

या वधु वर परिचय मेळाव्यास रावेर – यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, मेळाव्याचे आयोजक नारायण कोळी साकरीकर व विविध क्षेत्रातील समाज बांधवाच्या उपस्थित आद्य कवि, महर्षि वाल्मिक ऋषी यांचा प्रतिमेचे पूजन करुन परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी आ.शिरीष चौधरी यांनी उपस्थित वधू वरांना कमी खर्चात विवाह करण्याबाबत व इच्छूक वधू वरांना सामुहिक सोहळ्यात होणाऱ्या कमी खर्चाबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उपवर वधू वरांनी आपले परीचय करुन दिले. समाजाच्या वतीने लवकरच सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव, चोपडा तालुक्यातील विविध कोळी समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य आत्मराम कोळी, रावेर पंचायत समितीच्या सभापती कविता कोळी, सुनिता तायडे, वढोदा सरपंच संदिप सोनवणे, मनोहर कोळी, बंडू कोळी, नंदू सोनवणे, पाडळसा सरपंच खेमचंद कोळी, भुसावळ पंचायत समितीच्या सभापती वंदना उन्हाळे, डॉ.स्वप्नील साळुंखे, अशोक सपकाळे, आशा टोकरे, महेद्र सपकाळे आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती.

Protected Content