दुचाकीवरून घसरून पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील शहरातील अथर्व हॉस्पिटलजवळ ३५ वर्षीय तरूण हा दुचाकीवरून घसरून पडल्याने डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीत उपचारादरम्यान गुरूवार २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. मुकेश रमेश पाटील वय ३५ रा. जामनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक असे की, मुकेश पाटील हा तरूण आपल्या परिवारासह जामनेर शहरात वास्तव्याला होता. १९ एप्रिल रोजी मुकेश पाटील हा कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीने निघाला होता. त्यावेळी जामनेर शहरातील अथर्व हॉस्पिटलजवळ त्याची दुचाकी घसरल्याने त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला जामनेर येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना गुरूवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता प्राणज्योत मालविली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश परमार हे करीत आहे.

Protected Content