जातीवाचक शिवीगाळ करणारा व्हिडीओ व्हायरल प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जातीवाचक शिवीगाळ करणारा व्हिडीओ तयार करीत तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी २३ एप्रिल रोजी रात्री उशीरा पवन सोनवणे व मयुर नन्नवरे दोघ रा. भोलाणे, ता. जळगाव यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सोशल मीडियावरील एका व्हाट्सग्रुपवर जातवाचक शिवीगाळ करणारा व्हिडीओ तयार करीत तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले. यामध्ये दोन जण एका अल्पवयीन मुलाला सोबत घेवून त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत होते.  दरम्यान, व्हीडीओ तयार करणारे हे पवन सुरेश सोनवणे व मयूर ज्ञानेश्र्वर नन्नवरे दोघ रा. भोलाणे यांनी तयार केला आहे. त्या दोघांकडून व्हिडीओ तयार करण्याची चूक झाली असून ते दोघ समाजाची माफी मागण्यास तयार आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका जातीचा अपमान झालेला असल्यामुळे शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार लहान मुलाच्या अजाणतेपणाचा फायदा घेवून त्याच्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणाऱ्या दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे करीत आहे.

Protected Content