जुन्या वादातून महिलेला चौघांकडून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील महात्मा फुले नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ कन जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी सकाळी  घडला आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सकीनाबी इमाम पिंजारी (वय-५५) रा. महात्मा फुले नगर, भुसावळ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता गणेश बिजागरे, सुकलाल बिजागरे, मंग्या बिजागरे आणि सत्या बिजागरे सर्व रा. महात्मा फुले नगर यांनी महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने भुसावळ शहर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौघांवर दुपारी ३ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सोनवणे करीत आहे.

Protected Content