कोरोना : पालिका रुग्णालयात संशयितासाठी विशेष कक्ष; दोन रुग्णवाहिका सज्ज

भुसावळ, प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेच्या संत गाडगे महाराज रूग्णालयामध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी ८ खाटेचे स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शिवाय कोरोनाशी दोन हात करण्यासाठी व दोन रुग्णवाहिका सज्ज असून पीपीई कीट उपलब्ध आहे.

भुसावळ शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये तोडकी मनुष्यबळ डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची संख्या पालिका रुग्णालयात आहे. शहरांमध्ये संत गाडगे महाराज पालिका रुग्णालयासह खडका रोड, बद्री प्लॉट ,महात्मा फुले नगर, आयुर्वेदिक डिस्पेंसरी याठिकाणी पालिकेचे रुग्णालयाचे उपकेंद्र आहेत. मुख्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. किर्ती फलटणकर व डॉ. तौसीफ खान हे रुग्णांना सेवा देतात. खडका रोड येथे डॉ. अर्शिया शेख, बद्री प्लॉट येथे डॉ. रूपाली सावकारे, महात्मा फुले नगर येथे डॉ.अतिया खान, आयुर्वेदिक डिस्पेंसरीला डॉ. संदीप जैन हे पालिकेच्या रूग्णालयामध्ये सेवा देत आहे. याशिवाय ३२ कर्मचारी, १५ सुपरवायझर ,१३ नर्सिंग स्टाफ, ५० आशा वर्कर यांच्यावर शहरातील पालिका रुग्णालयातील धुरा आहे. जी लोकसंख्येच्या तुलनेत तोकडी आहे.

संशयितांसाठी स्वतंत्र कक्ष
संत गाडगे महाराज पालिका रुग्णालयांमध्ये ८ खाटेच्या स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे याशिवाय पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) किट पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे या किटमध्ये संशयित रुग्णवर उपचार करण्यासाठी गाऊन, मास्क, पायातली रबडी मौजे, हाथगल्बज, गॉगल हे साहित्य उपलब्ध आहे तसेच हे कीट घालण्यासाठी सरळ पद्धतीने घालावे व किट काढण्याची वेगळी पद्धत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किर्ती फलटणकर यांनी लोकमत ला सांगितले, दरम्यान सद्यस्थितीमध्ये पालिका रुग्णालयात दोन तज्ञ डॉक्टर व सहा सिस्टर यांची अत्यंत आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. पालिका रुग्णालयात सर्व कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात आले असून दररोज संध्याकाळी घरी जाण्याच्या पूर्वी जैविक वैद्यकीय कचरा संकलन या एका विशिष्ट गाडीमध्ये वापरलेले मास्क व इतर साहित्य टाकले जातात जेणेकरून कोणतेही संसर्ग याद्वारे फैलावू नये हा यामागचा उद्देश आहे.

खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांना दिले पत्र

शहरामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक याठिकाणी खाजगी ट्रॅव्हल द्वारे प्रवासी ये-जा करतात अशा प्रत्येक प्रवासाची संपूर्ण माहिती ची नोंद करून घ्यावी अशा सूचना पालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या असून गाडीमध्ये प्रत्येक प्रवाशाला सतर्क ते विषयी जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनातर्फे शहरांमध्ये पोस्टर्स, उद्घोषणाद्वारा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी ८ खाटांचे स्वतंत्र कक्ष, उपस्थित डॉक्टर व कर्मचारी शिवाय ट्रे मध्ये पीपीई किट सुद्धा उपलब्ध आहे.

Protected Content