कोरोनाबंदीत राज्यात २१ हजार लोकांना नोकऱ्या

 

पुणे, वृत्तसंस्था । कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाउनच्या काळात आयोजित केलेल्या ऑनलाइन रोजगार मेळावे; व महास्वयम् वेबपोर्टलमार्फत जुलै महिन्यात २१ हजार ५७२ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाउनच्या काळात आयोजित केलेल्या ऑनलाइन रोजगार मेळावे; व महास्वयम् वेबपोर्टलमार्फत जुलै महिन्यात २१ हजार ५७२ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. इच्छुक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

तत्पूर्वी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात एकूण ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यात सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. यावर बेरोजगार उमेदवार स्वत:च्या सर्व माहितीसह नोंदणी करतात. कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजकही या वेबपोर्टलवर नोंदणी करून उमेदवार शोधू शकतात.

एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यापैकी सुमारे १७ हजार ७१५ जणांना रोजगार मिळाला. त्यानंतर जुलै महिन्यात ५८ हजार १५७ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. जुलैमध्ये २१ हजार ५७२ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले आहे.

‘लॉकडाउनमध्ये कौशल्य विकास विभागातर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावे घेण्यात येत होते. एप्रिल ते जून या ३ महिन्यांत २४, तर जुलै महिन्यात ३१ ऑनलाइन रोजगार मेळावे झाले. जुलैमधील मेळाव्यांमध्ये २०४ उद्योजकांनी सहभाग घेतला,

Protected Content