Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0
39

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस आणि शिवसेना पक्षाचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

नेताजी सुभाष चंद्र बोस आणि शिवसेना पक्षाचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देत त्यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, प्रमोद बोरोल, आर.एस. पाटील, उदय कुलकर्णी यांच्यासह महसूल विभागसह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound