धावत्या रेल्वेसमोर आल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान डोकलखेडा ते वरसाडे गावालगत असलेल्या रेल्वे लाईनवर कोणत्यातरी धावत्या रेल्वेसमोर आल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान डोकलखेडा ते वरसाडे गावालगत असलेल्या रेल्वे कि. मी. खंबा क्रं‌. ३९१ /२३ / २५ नजीक डाऊन लाईनवर एक पुरुष पडला असल्याची माहिती मुंबई कडुन भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या दुरोन्तो एक्सप्रेसचे लोको पायलट यांनी माहेजी रेल्वे स्थानकाचे उपप्रबंधक यांना दिली. त्यांनी सदरची खबर पाचोरा रेल्वे स्टेशनचे प्रबंधक यांना दिल्यानंतर त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पी. एस. आय. योगेश गणगे, पोलिस हेड कॉन्स्टेबल शामकांत पाटील, दिलीप वाघमोडे, चालक समीर पाटील व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा केला. मयत अनोळखी इसमाचे अंगावर भुरकट पांढऱ्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट त्यावर उभ्या चौकटी रेषा, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व काळ्या रंगाचे जरकीन असे मिळुन आले आहे. मात्र मयता जवळ ओळखीचे कुठलेही दस्तऐवज मिळुन न आल्याने मृतदेह हा रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अनोळखी इसमाचा अपघाताची नोंद करण्यात आली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल शामकांत पाटील हे करीत आहे. मयत अनोळखी इसमाबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन पाचोरा पोलिसांकडुन करण्यात आले आहे.

Protected Content