महायुतीचे उद्या शक्ती प्रदर्शन : रक्षाताई व स्मिताताई भरणार अर्ज !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाविकास आघाडीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन केल्यानंतर उद्या महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ हे आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) मनसे; रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप, पीआरपी(कवाडे गट) प्रहार, लहूजी शक्ती सेना महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती खा रक्षाताई खडसे ह्या उद्या गुरुवारी भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी, ग्रामविकास मंत्री ना गिरीशभाऊ महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या घटक पक्षांकडून यावेळी भव्य शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालय (जी.एम. फाउंडेशन) ते जिल्हाधिकारी कार्यालय, अशी भव्य पदयात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येईल.

दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण (महायुतीचे समन्वयक), संजय पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष व महायुतीचे समन्वयक) आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार एम.के. अण्णा पाटील, माजी खासदार ए.टी. नाना पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा),अमोल हरिभाऊ जावळे (जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा), उज्वलाताई बेंडाळे ( जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा भाजपा), नंदकिशोर महाजन (भाजपा रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख), डॉ.राधेश्याम चौधरी, (भाजपा जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख), निलेश पाटील (जळगाव जिल्हाप्रमुख शिवसेना), रावसाहेब पाटील (जळगाव जिल्हाध्यक्ष शिवसेना), वासुदेव पाटील (जळगाव जिल्हाध्यक्ष शिवसेना), जमील देशपांडे (जिल्हाध्यक्ष मनसे), अभिषेक पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महानगराध्यक्ष) सौ.मीनल ताई पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) सौ. सोनालीताई नारायण पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) सौ.सरिताताई माळी-कोल्हे (शिवसेना), गणेशभाऊ सोनवणे (शिवसेना), आनंदभाऊ खरात ( आठवले गट), अनिल अडकमोल (आठवले गट आरपीआय) राजूभाऊ मोरे (जोगेंद्र कवाडे गट), दिनेश खरात (लहूजी सेना ), श्री.सुर्यवंशी (रासप) यांनी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

दरम्यान, याआधीच ना. गिरीश महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतांना मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे उद्या महायुतीतर्फे जंगी रॅली काढून महाविकास आघाडीच्या रॅलीस प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.

Protected Content