महाराष्ट्राला एक इंचही जागा नाही देणार – बी. एस. येडीयुरप्पा

bs yeddyurappa

 

बेंगळुरू वृत्तसंस्था । कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात पडसाद उमटले असून या वादात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी उडी घेतली आहे. महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नसल्याचे वक्तव्य येडीयुरप्पा यांनी केले आहे. यापूर्वीच तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शनिवारी सायंकाळपासून दोन्ही राज्यांदरम्यानची बससेवा बंद करण्यात आली होती. आता मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

महाजन आयोगानुसार (वादग्रस्त भागांपैकी) कोणता भाग महाराष्ट्राला आणि कोणता भाग कर्नाटकला द्यायचे हे स्पष्ट आहे, असे येडीयुरप्पा म्हणाले. (सीमावादावर) अशा प्रकारचा वाद निर्माण करणे हे योग्य नाही. आम्ही महाराष्ट्राला एक इंच देखील जमीन देणार नाही, असे येडीयुरप्पा यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बेळगाव आणि महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर गोळ्या घातल्या पाहिजेत असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पाटील यांनी केले होते. दोन्ही बाजूंना तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शनिवारी संध्याकाळपासून दोन्ही राज्यांदरम्यानची बससेवा स्थगित करण्यात आली आहे. पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीत उमटायला सुरु झाल्यानंतर सीमावासियावरील अन्यायाच्या विरोधात शिवसेनेतर्फे कोल्हापुरात रविवारी निषेध फेरी काढण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंडळी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेना व कन्नड रक्षक वेदिकेचा त्यांनी निषेध करण्यात आला.

Protected Content