पाडवींवर राज्यपाल संतापले; दुसऱ्यांदा दिली शपथ

K. C. Padvi

मुंबई वृत्तसंस्था । अक्कलकुवा मतदारसंघ काँग्रेसचे आमदार के.सी. पाडवी यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. केसी पाडवी मंत्रिपदाची शपथ घेत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्यावर संतापले. केसी पाडवी यांच्या शपथविधीवर राज्यपालांनी नाराजी व्यक्त करत पाडवींना पुन्हा शपथ वाचायला लावली.

मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एक नमुना ठरलेला असतो. शपथ घेताना त्यातील मजकूर वाचणे अपेक्षित असते. मात्र, काँग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार पाडवी यांनी शपथेच्या नमुन्याखेरीज स्वत:चं मनोगतही व्यक्त केलं. त्यामुळं राज्यपाल संतापले. त्यांनी पाडवी यांना समज दिली. आपल्याला दिलं गेलं आहे तेच वाचावं. अनावश्यक वाचू नये, असं राज्यपाल म्हणाले. ‘माझ्यासमोर अनेक ज्येष्ठ नेते बसले आहेत. स्वत: शरद पवार आहेत. वाटल्यास त्यांना विचारा. त्यांना योग्य वाटत असेल तर माझी हरकत नाही,’ असंही राज्यपाल म्हणाले. तसंच, पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. त्यानंतर पाडवी यांनी परंपरेनुसार शपथ घेतली. शपथपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर पाडवी यांनी राज्यपालांची माफीही मागितली.

Protected Content