राऊतांनी पुन्हा एकदा गुलाबभाऊंना केले ‘लक्ष्य’ !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कालच जोरदार टीका केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.

काल खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली होती. अगदी कुणीही नसलेल्यांना शिवसेनेने आमदारकी आणि मंत्रीपदे दिल्याचे अनेक उदाहरणे देत त्यांनी या सर्वांवर टीकास्त्र सोडले. यात त्यांनी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे यांच्यासारख्या अतिशय सर्वसामान्य स्थितीतील शिवसैनिकांना खूप मोठी पदे दिल्याचे सांगत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. तर अदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना उध्दवजींनी आधीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट केला. त्यांनी देखील बंडखोरांवर टीका केली होती.

या पार्श्‍वभूमिवर, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी गुलाबराव पाटील यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. यात ते निष्ठेबाबत बोलतांना दिसून येत आहे. याला कॅप्शन देतांना राऊत यांनी अतिशय खोचकपणे टिकास्त्र सोडले आहे. यामुळे लागोपाठ दोन दिवस त्यांनी गुलाबराव पाटलांनाच टार्गेट केल्याचे दिसून आले आहे.


खाली पहा : संजय राऊत यांनी केलेले ट्विट !

Protected Content