सासरच्यांच्या छळाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी | पती व सासरच्या छळाला कंटाळून तालुक्यातील आव्हाने येथील 31 वर्षीय विवाहितेने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरकडील मंडळीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आव्हाने येथील राजेंद्र दिलीप जाधव यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रामचंद्र वामन पवार यांची दुसरी कन्या माधुरी यांच्याशी 2007 मध्ये झाला होता. त्यांच्या संसारवेलीवर श्रध्दा व पुर्वा अश्या दोन मुली झाल्या. दरम्यान पत्नीला दोन मुली झाल्या व मुलगा झाला नाही तसेच घरातील विविध कारणांवरून विवाहिता माधुरी हिचा सासरच्या मंडळींसह पती राजेंद्र दिलीप जाधव, सासरे दिलीप रामचंद्र जाधव, सासूबाई दिलीप जाधव, जेठ चंद्रकांत दिलीप जाधव सर्व रा. आव्हाने ता. जि. जळगाव अशांनी तिला मारहाण, शिवीगाळ, शारीरिक व मानिसिक छळ सुरू केला.  तिला बळजबरीने माहेरी सोडून देणे पुन्हा घरात न घेणे तसेच मुलींना भेटू न देणे अशा प्रकारचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेल्या होत्या. माधुरी यांनी २७ एप्रिल २०२१ रोजी शिंदखेडा न्यायालयात खटला दाखल केला होता. या रागातून माधुरी हिला घराबाहेर काढून दिले व दोन्ही मुली ठेवून घेतल्या. दरम्यान काल बुधवारी २३ जून २०२१ रोजी माधरीला दोन्ही मुलींची आठवण होत असल्यामुळे जळगावला आली होती. त्यानंतर त्या आव्हाणे येथील सासरी गेली असताना माधुरीला घरातून हाकलून दिले व मुलींना भेटूही दिले नाही. त्यामुळे माधुरी जळगावातील प्रेमनगरात राहणारी मुधरीची लहान बहिण पुनम हिच्या घरी आली. आज गुरूवारी २४ जून रोजी सकाळी पाच वाजता माधुरी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघाल्या. आणि सकाळी ७ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. हा प्रकार घडल्यानंतर मयत माधुरीचे वडील रामचंद्र पवार हे जळगावत दाखल झाले मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. दरम्यान पती व सासरच्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांनी तालुका पोलिसात दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Protected Content