सावखेडा सिम पोलीस पाटलाला मारहाण करणाऱ्या संशयितांना न्यायालयीन कोठडी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथील पोलीस पाटील यांच्या घरात घुसुन मारहाण करणाऱ्या पाच संशयीतांना न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पाचही जणांना जळगाव येथील उपकारागृहात पाठविण्यात आले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, सावखेडा सिम तालुका यावल येथील पोलीस पाटील पंकज जिवन बडगुजर यांना गावातील राहणारे प्रकाश सुभाष पाटील, दिलीप सुभाष पाटील, विकास पंडीत पाटील, विजय विकास पाटील आणी चेतन विकास पाटील यांनी २ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वरील सर्वांनी वाळूच्या ट्रक्टरच्या पकडून देण्याच्या कारणावरून पोलीस पाटील पंकज बडगुजर व त्यांच्या कुटुंबास अनधिकृतपणे वरील संशयित आरोपी हे  घरात घुसुन लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात यावल पोलीस स्टेशनला पोलीस पाटील पंकज बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला गेला होता. ३ जुलै रोजी संशयित आरोपींना प्रकाश पाटील, दिलीप पाटील, विकास पाटील, विजय पाटील आणी चेतन पाटील या पाचही जणांना अटक केली होती. आज रविवारी ४ जुलै रोजी यावल न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश एम.एस.बनचरे यांनी पाचही जणांना १४ दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

Protected Content