धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरूण गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील असोदा रेल्वे गेटजवळ एका धावत्या रेल्वेतून अंदाजे ४० वर्षीय अनोळखी तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ३ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. रेल्वे कर्मचारी व नागरीकांच्या मदतीने जखमी तरूणाला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव ते आसोदा दरम्यान असलेल्या आसोदा रेल्वे गेटजवळ बुधवारी ३ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून अंदाजे ४० वर्षीय अनोळखी तरूण खाली पडल्याची घटना समोर आली आहे. तरूण जखमी अवस्थेत पडून आल्याची माहिती रेल्वे कर्मचारी सुभाष सपकाळे आणि विकासकुमार यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आसोदा गावातील गिरीष प्रदीप चिरमाडे आणि निखिल भानूदास चिरमाडे यांच्या मदतीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यात तरूणाच्या छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यासंदर्भात अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content