Home Cities जळगाव मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २० जणांसह ५७६ वाहनधारकांवर कारवाई ; जळगाव पोलिसांकडून...

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २० जणांसह ५७६ वाहनधारकांवर कारवाई ; जळगाव पोलिसांकडून पावणे पाच लाखांचा दंड वसूल

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २० जणांसह एकूण ५७६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ४ लाख ७२ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एका व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (२६ नोव्हेंबर) रात्री जिल्हाभरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथके तैनात करून वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहतूक शाखेच्या माध्यमातूनही विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. वाहतुकीचे नियम मोडणारे, मद्यप्राशन करून वाहन चालविणारे तसेच अंमली पदार्थांचे सेवन, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात एकूण २ हजार २०० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २० जणांवर कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतुकीच्या चार, कर्णकर्कश हॉर्नच्या दोन आणि कर्कश सायलेंसरच्या एका प्रकरणातही कारवाई करण्यात आली. याशिवाय ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४७ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.विविध प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ५७६ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या सर्व कारवाईतून ४ लाख ७२ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला. विशेष पथकांच्या माध्यमातून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

 

दरम्यान, अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली, तर अन्य १२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलिसांच्या या विशेष मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट प्रवास आणि कर्णकर्कश हॉर्न व सायलेंसर वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील २ हजार २०० वाहनांची तपासणी करून ५७६ वाहनधारकांवर कारवाई आणि पावणे पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याने वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.


Protected Content

Play sound