जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढलेल्या मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीचे तब्बल ३३ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, तरुण नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदूर, मध्य प्रदेश) या संशयित आरोपीला कासमवाडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्व रेड्डी यांनी सोमवारी २३ जून रोजी दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी श्री. संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला सुचना देण्यात आल्या होत्या.
शनीवारी २१ जून रोजी जळगावातील कासमवाडी परिसरात बाजार असल्याने पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउपनिरी राहुल तायडे, पोउपनिरी चंद्रकांत धनके, पोना प्रदीप चौधरी आणि पोकॉ रतन गिते यांना बाजारात पेट्रोलिंग करत असतांना त्यांना एक संशयित आरोपी तरुण आणि दोन अल्पवयीन मुले संशयीतरित्या फिरताना दिसले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चार मोबाईल सापडले. मोबाईलबाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता, त्यांनी स्वामी नारायण मंदिराच्या जवळ पाल टाकून राहत असलेल्या शेतात जमिनीमध्ये एका पिशवीत मोबाईल पुरून ठेवल्याचे सांगितले.
४ लाखांचे ३३ मोबाईल हस्तगत; रावेरमधील ८ मोबाईलही मिळाले
आरोपीला सोबत घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने शेतातील एका झाडाजवळ जमिनीतून पुरून ठेवलेल्या पिशवीतील एकूण ४ लाख ९ हजार किंमतीचे ३३ मोबाईल काढून दिले. हे सर्व मोबाईल शनिवार बाजार तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारांमधून चोरी केल्याची कबुली संशयित आरोपी आरोपी तरुण नोरसिंह गुजरिया याने दिली. प्त केलेल्या ३३ मोबाईलपैकी एक मोबाईल रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलीस ठाण्याचे अंमलदार महेश मोगरे हे त्या मोबाईलच्या शोधात एमआयडीसी येथे आले असता, त्यांना रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले एकूण ८ मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोना हेमंत जाधव हे करत आहेत.