अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील देवळी गावाजवळील वळणावर भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाचे जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनामधील वृध्द महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात चारचाकीवरील अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, डॉ. विशाल विजय पोतदार (वय-४६) रा.चोपडा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान ते कामाच्या निमित्ताने त्यांच्या दुचाकीने रविवारी ११ नोव्हेंबर फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजता दुचाकीने जात होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (जीजे २६ ए ५१२५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात चारचाकी वाहनात बसलेली वृध्द महिला (नाव गाव माहित नाही) आणि दुचाकीवर बसलेले डॉ. विशाल पोतदार हे दोघे जखमी झाले. जखमींना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर सकाळी ११ वाजता डॉ.विशाल पोतदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील हे करीत आहे.