कंपनीत पन्नास टक्के भागीदारी देण्याच्या नावाखाली एकाची सहा लाखात फसवणूक; संशयिताला अटक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव प्लॉस्टिकची कंपनीत ५० टक्के भागीदारी देण्याच्या नावाखाली गुजरात राज्यातील नवसारी येथील एका शेतकऱ्याची ५ लाख ८५ हजारांची फसवणूक करणाऱ्या जळगाव येथील संशयित आरोपीला आज एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, सुलेमान इस्माईल दिलेर (वय-४७) रा. दिलेर इस्टेट वेश्मा. ता. जलालपूर जि. नवसारी (गुजरात) यांची जळगाव येथील जावेद सलिम पटेल रा. शेरा चौक यांची नातेवाईकांमुळे तडकेश्वर जि. सुरत येथे जानेवारी २०१४ मध्ये ओळख झाली. जावेद पटेल याची सुरत येथील ऊनपाटीया येथे प्लॉस्टिक दाण्याची कंपनी होती. सुलेमान दिलेर यांचे शालक मौलाना अय्युब फकिर यांना घेवून जावेद पटेल हे दोघे डिसेंबर २०१४ मध्ये सुलेमान यांच्याकडे गेले. आपण अर्धे-अर्धे भागीदारीतून जळगाव येथील मुळगावी जळगाव एमआयडीसील अशीच एक प्लॉस्टिक दाण्याची कंपनी सुरू करावयाची असल्याचे सागितले. सुलेमान यांनी ५० टक्के भागीदारी करण्यासाठी कंपनीची जागा पाहण्यासाठी ३ जानेवारी २०१५ रोजी जळगावला काही नातेवाईक व मित्रांसोबत जळगावला आहे. जळगाव एमआयडीसीतील एक बंद पडलेली कंपनी दाखवून आपण इथेच कंपनी सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार सुलेमान यांनी जावेद याला ५ लाख रूपये मित्रांसोबत दिले. पाच लाख रूपये दिल्याचा करारनामा सुलिमान दिलेर यांनी लिहून घेतला होता. पैसे देवून ते पुन्हा गुजरात ला निघून गेले. त्यानंतर काही महिन्यांनी नफ्याची रक्कम मागितली असता कंपनी तोट्यात असल्याचे जावेद पटेलने सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर २०१७ मध्ये जावेदने ९० हजार रूपये रोख परत केले. कंपनीत अजून चांगला नफा मिळविण्यासाठी जावेदने अजून दोन रूपये सुलेमान दिलेर यांच्याकडून घेतले. वारंवार पैश्यांचा तगादा लावला असता त्यांनी चार ते पाच वेळा बँकेत जवळपास २३ हजार ४१९ रूपये ट्रान्सफर केले. सुलेमान दिलेर यांनी दिलेल्या ७ लाख पैकी १ लाख १३ हजार रूपये परत केली. मात्र उर्वरित रक्कम ५ लाख ८६ रूपयांची फसवणूक केली. सुलेमान दिलेर यांनी जळगाव गाठून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जावेद पटेल यांच्या विरोधात फिर्याद दिली. एमआयडीसी पोलीसात फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर स.फौ. अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, इम्रान सय्यद, संदीप धनगर यांनी कारवाई करत संशयित आरोपी जावेद पटेल याला अटक केली असून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Protected Content