पद असो किंवा नसो जनतेची सेवा करीत राहणार

 

एरंडोल प्रतिनिधी । राजकीय जीवनात पद असो किंवा नसो जनतेची सेवा नेहमी करत राहणार असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री डॉ. सतिश  पाटील यांनी केले. त्यांच्या  स्थानिक आमदार निधीतून हणुमंतखेडे सिम येथील १० लक्ष रुपये किमतीचे सामाजिक सभागृह बांधकामाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

यालोकार्पण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जळगाव येथील परम पिता ब्रह्म कुमारीय विश्व विद्यालयाच्या विभाग प्रमुख मीनाक्षी दिदी, य.च.शी. प्र.मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, सांडु पाटील,संजय पाटील,डाॅ.अजाबराव पाटील, ,भालेराव पाटील, भास्कर पाटील, नगरसेवक डाॅ. सुरेश पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, राष्ट्रवादी जिल्हासरचिटणीस डाॅ. राजेंद्र देसले, पारोळा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष बाळूनाना पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, विश्वासराव पाटील, युवक जिल्हाउपाध्यक्ष विजय पाटील, युवक जिल्हासरचिटणीस संदीप वाघ, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अॅॅड.अहमद सय्यद, युवक तालुकाध्यक्ष किशोर पाटील, रविंद्र पाटील, नगरसेवक अभिजीत पाटील, योगराज महाजन, दिपक पाटील गावातील व परिसरातील भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Protected Content